शासकीय कार्यक्रम, मेळाव्यांवर 15 दिवसांसाठी बंदी

नागरिकांच्या शंका-समाधानासाठी प्रशासनाने 1077 हा टोल-फ्री क्रमांक सुरू केला आहे. 'कोरोना'संदर्भात काहीही शंका असेल, तर नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन द्विवेदी यांनी केले.
government programmes banned in nagar for fifteen days  
government programmes banned in nagar for fifteen days  

नगर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील यात्रा, जत्रा, लग्न समारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांमध्ये गर्दी दिसल्यास प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रा केवळ नावालाच होणार आहेत.

"कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शासकीय कार्यक्रम, मेळाव्यांवर आगामी 15 दिवसांसाठी बंदी घातली आहे. वाढदिवस, लग्न, जत्रा, यात्रांसाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे. यात्रांना गर्दी करू नये, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्यास प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल,'' असे द्विवेदी यांनी सांगितले.

ते म्हणाले, "कोरोना संसर्गजन्य विषाणूचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. प्रशासनाने पूर्ण सतर्कता बाळगली आहे. नागरिकांनी "कोरोना'बाबत भीती बाळगण्याची गरज नाही; परंतु गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. दुबईवरून आलेल्या येथील चौघांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. मढी येथील यात्रेसंदर्भात देवस्थान कमिटीशी संपर्क झाला आहे. एरव्ही होणारी लक्षणीय गर्दी यंदा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.'' 

"परदेशातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासाठी ट्रॅव्हल्स, टूर एजन्सीचालकांची बैठक घेणार आहोत. तसेच मॉल, सिनेमागृहांनादेखील स्वच्छताविषयक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिक सुजाण व सूज्ञ आहेत. आगामी जत्रा, यात्रेला ते गर्दी करणार नाहीत. जागरूकतेबाबत नगरकरांचा कमालीचा पुढाकार असतो. त्यामुळे कमीत-कमी कायद्याचा वापर करून परिस्थिती हाताळली जाईल,'' असा विश्‍वास द्विवेदी यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com